मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्याला वाढदिवसानिमित्त अनोखे बर्थडे गिफ्ट..

बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्याला वाढदिवसानिमित्त अनोखे बर्थडे गिफ्ट..

काल २७ जूलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ६० वा वाढदिवस होता. राज्यातील हजारो शिवसैनिकांनी सामाजिक उपक्रम राबवून हा जन्मदिवस साजरा केला. राज्यासह देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसारख्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्याला वाढदिवसानिमित्त अनोखे बर्थडे गिफ्ट दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचा जीएसटीचा परतावा राज्याला परत मिळावा यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत होते. मात्र केंद्राकडून आतापर्यंत या विषयावर म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं नव्हतं.

परंतु काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनीच केंद्र सरकारने राज्याच्या हक्काचा जीएसटीचा परतावा राज्याला दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकारने काल महाराष्ट्राच्या हक्काच्या जीएसटी परताव्यातील १९ हजार कोटी २३३ कोटी रुपयांचा परतावा मंजूर करण्यात आल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्य अडचणीत असताना केंद्राकडून राज्याचा हक्काचा पैसा मिळत नसल्याने जीएसटी परताव्याचा विषय गेले अनेक दिवस चर्चेत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या पैशांसाठी केंद्राकडे सतत पाठपुरावा करत होते. त्याचं फलश्रुत मिळाल्याचं बोललं जातं आहे.

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातील सर्व उद्योगधंदे, काम वगैरे बराच काळ लॉकडाऊन मध्ये बंद पडल्याने राज्याची अर्थव्यवस्था अस्थिर झाली आहे. राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण पडत आहे.

राज्य सरकार आर्थिक संकटात सापडले आहे. असं असुनही केंद्र सरकार महाराष्ट्राच्या हक्काचा पैसा राज्याला देत नसल्याने महाविकासआघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी केंद्र सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पण अखेरीस हा विषय मार्गी लागला आहे.