ठाकरे सरकारचा धडाकेबाज निर्णय,राज्यभरातून होतंय कौतुक..

बातम्या

सध्या राज्यात कोरोनाचं संकट उभे असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी सरकारने कौतुकास्पद निर्णय घेण्याचा धडाका काही कमी केलेला नाही. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज एमआयडीसीच्या “महाजॉब्स” वेबसाईटचं उद्घाटन करण्यात आले. राज्यातील भुमीपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुभाष देसाई, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक आणि आदिती तटकरे हे मंत्री उपस्थित होते.

सुभाष देसाई यांनी यावेळी डोमिसाईल असणार्यांनाच नौकरी मिळेल अशी घोषणा केली आहे. डोमिसाईल बंधनकारक केल्याने राज्यात उपलब्ध होणार्या नौकरींमध्ये जास्तीत जास्त रोजगार महाराष्ट्राच्या भुमिपुत्रांना मिळणार आहेत.

अनलॉक १ चालू झाल्यापासून आतापर्यंत राज्यात ६५००० उद्योग चालू झाले आहेत. त्यामुळे कुशल कामगारांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारने विविध १२ देशातील उद्योजकांसोबत महाराष्ट्रासाठी तब्बल १६ हजार कोटी रुपयांचे करार केले आहेत. त्यामुळे आज झालेल्या या निर्णयाचा राज्यातील तरूणांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे :-