विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन नावे जाहीर..’या’ नेत्यांची लागणार वर्णी.

Uncategorized

विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन नावे जाहीर..’या’ दोन नेत्यांची लागणार वर्णी.. gglnw_ad

राज्यात २१ हे रोजी ९ जागांसाठी विधानपरिषद निवडणुका पार पडणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने या निवडणुका घेण्याची परवानगी दिल्यानंतर निवडणूक आयोगाने २१ तारखेला मतदान होईल अशी घोषणा केली. gglnw_ad

या विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेकडून दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. gglnw_ad
एक म्हणजे स्वत: शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दुसर्या जागी शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. gglnw_ad

विधानपरिषदेच्या या ९ जागांपैकी शिवसेना-राष्ट्रवादीला प्रत्येकी २ , कॉंग्रेसला १ आणि भाजपच्या ३ किंवा ४ जागा निवडून येऊ शकतील असं सध्या संख्याबळानुसार चित्र आहे. gglnw_ad
शिवसेनेने आपले दोन्ही उमेदवार जाहीर केले आहेत. इतर पक्षांकडून उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. gglnw_ad

राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने एप्रिल महिन्यात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. gglnw_ad
त्यामुळे कुठल्याही सदनाचे सदस्य नसलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर मोठा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला होता. gglnw_ad
राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल नियुक्त कोट्यातून उद्धव ठाकरे यांना आमदार म्हणून निवडावे अशी मागणी दोन वेळा केली. gglnw_ad
या मागणीनंतर राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनातील भेटीगाठी वाढल्या. मात्र राज्यपालांनी राज्य सरकारच्या त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. gglnw_ad
निवडणूक आयोगाला राज्य सरकारने पत्र पाठवून निवडणुका लावण्याची विनंती करावी असा सल्ला त्यांनी दिला होता. gglnw_ad

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा देखील झाली. gglnw_ad
राज्यात निवडणूक लावण्यासाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिली आणि २१ मे रोजी मतदान होईल असे जाहीर केले. त्यामुळे २१ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानपरिषद आमदार म्हणून निवडून येतील आणि राज्यासमोरचा हा घटनात्मक पेचप्रसंग सुटेल. gglnw_ad

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे हे शिवसेनेकडून विधानपरिषदेवर जाणारे दोन आमदार असणार आहेत. gglnw_ad
आता इतर पक्ष कुणाला उमेदवारी जाहीर करतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.