शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या,पारनेरच्या त्या ५ नगरसेवकां विषयी मोठी बातमी.

बातम्या

शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या,पारनेरच्या त्या 5 नगरसेवकां विषयी मोठी बातमी.

काही दिवसांपूर्वी पारनेर नगरपालिकेतील शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता.त्याबाबत आज मोठी बातमी समोर आली आहे.

पक्षप्रवेश केलेल्या त्या पाचही नगरसेवकांची घरवापसी होणार असुन ते पाचही नगरसेवक मातोश्री वर दाखल झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे पारनेर नगरपालिकेतील ५ नगरसेवक फोडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

त्यामुळे आज त्या ५ नगरसेवकांना परत शिवसेनेत प्रवेश करून घरवापसी झाल्याने आज मुख्यमंत्र्यांचं सरकारमधील वजन पुन्हा एकदा दिसून आल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय तथा स्वीय सहाय्यक मिलींद नार्वेकर यांनी या प्रकरणी यशस्वी मध्यस्थी केली असल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काल संध्याकाळी तब्बल अडीच तास गुप्त बैठक झाली होती. शिवसेनेतून गेलेल्या नगरसेवकांना परत पाठवावे असा संदेश मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला होता

आणि अजित पवार यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत त्या ५ नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले अशी माहिती समोर आली आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे सरकारमध्ये एकत्र असुन मित्रपक्ष आहेत. त्यामुळे आपापसात फोडाफोडीचे राजकारण होऊ नये,

अशाने कार्यकर्ते आणि जनतेत चुकीचा संदेश जाईल आणि हे तिन्ही पक्षासाठी हिताचे नाही या मुद्यावर ही मोठी राजकीय घडामोड घडल्याचे दिसून येते आहे.