पंतप्रधानांचा पगार किती? 30 टक्के कपात केल्यास किती पगार मिळणार?

Gk

पंतप्रधानांचा पगार किती? 30 टक्के कपात केल्यास किती पगार मिळणार?

देशाच्या पंतप्रधानाला पगार किती मिळते तुम्हाला माहीत आहे का ? जर नाही तर आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहोत.सोबत ही सुध्दा माहीती देणार आहे की ३० टक्के पगार कापून गेल्यानंतर शिल्लक किती उरतो.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना व्हायरस विरूद्ध महत्वाची पाऊलं उचलत आहेत.आता पीएम मोदीच्या अलाउंस व पेंशनच्या आदेशाला पार्लमेंटच्या सर्व सदस्थांनी १९५४ च्या कायद्यानुसार परवानगी दिलीय.
यानंतर आता सर्व लोकसभा आणि राज्यसभा संसदेची ३० टक्के पगार एक वर्षापर्यंत कापला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पगारीतून सुध्दा ३० टक्के हिस्सा एक वर्षापर्यंत कापला जाईल.चला तर त्याबद्दल जाणून घेऊ..

किती असते पंतप्रधानाला पगार
देशाच्या पंतप्रधानाला १ लाख ६० हजार रूपये पगार मिळते.

कापल्यानंतर किती पगार मिळेल ?

जर पंतप्रधानाच्या महीना पगार १ लाख ६० हजार मधून ३० टक्के कापल्यानंतर आपल्याला ४८००० रूपये कमी होतील.
म्हणजे पंतप्रधानाला १ लाख १२ हजार इतका पगार मिळेल.

कॅबिनेटचा निर्णय:-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेतला गेला.या बैठकित ठरवलं गेल की एक वर्षापर्यंत लोकसभा आणि राज्यसभा संसदेतील ३० टक्के पगार कापून जाईल.
यानुसार कॅबीनेटने मेंबर्स आॅफ पार्लमेंट अॅक्ट ,१९५४ नुसार पगार व पेंशन संधोघन च्या आदेशानुसार मंजुरी दिली.ज्यामध्ये संसदेतील सर्व सदस्यांच्या वेतन व पेंशन एका वर्षाकरीता ३० टक्के कापला जाईल.
हा नियम १ एप्रिल २०२० पासून लागू झाला.