या मराठी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी ४००० विद्यार्थी आहेत प्रतीक्षेत.

मराठी लेख

या मराठी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी 4000 विद्यार्थी आहेत प्रतीक्षेत,अशी आहे ही आंतरराष्ट्रीय शाळा

वाबळेवाडीची ५ स्टार शाळा ,बघून व्हाल हैराण.
पुण्यातील वाबळेवाडीमधील जिल्हा परिषद ची शाळा बघून व्हाल हैराण त्याला कारण ही तसच आहे.विद्यार्थ्यांसाठी अतिशय सोयी या शाळेने उपलब्ध केलेल्या आहेत.त्यामुळे या शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा दिला गेलाय.

प्रवेश:-
५ वर्षापुर्वी या शाळेत फक्त ३२ मुले शिकत होती परंतू सध्या या शाळेत ६१० मुले शिकत आहेत आणि ४ हजार पेक्षा जास्त मुले प्रवेश घेण्यासाठी पेंडींग आहेत.

वैशिष्ट्ये:-
अत्याधुनिक क्षेत्रात या शाळेने पाऊल ठेवलय .मुलांना जबरदस्त अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
अविष्कार नावाच रोबोट येथील विद्यार्थ्यांनी बनविलाय .
पर्यावरणाशी समतोल राखण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांना केलेला आहेत .
सौरउर्जेवर चालणारी ई बाईक सुध्दा या मुलांनी तयार केलीय.
अतिशय चांगल्या पध्दतीने ही मुल इंग्रजी बोलू शकतात.
टँब ,लंपटाॅप या महागड्या वस्तूसुध्दा शाळेने या मुलांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
अतिशय सुसज्ज अश्या पध्दतीच वाचनायलय या शाळेत आहे.
नवनवीन साॅफ्टवेअरची ओळख या मुलांना आहे.
तंत्रज्ञानासोबतच कला ,संगीत या क्षेत्रात या शाळेने आपला नावलौकीक केलेला आहे.

ईमारत:-
या शाळेची ईमारत ही भुकंप आणि अग्निरोधक आहे.
ही ईमारत स्वच्छ आणि सुसज्ज आहे.
दोन लेयरचे पत्रे असल्याने उन्हाळयात तापमानात त्रास होत नाही.

सोयी:-
मुलांना बसण्यासाठी बेंच ही आहेत आणि मोकळी जागा सुध्दा आहे.
काचेच्या भिंती असल्याने बागेत बसल्याचा फिल या मुलांना येतो.

हे शक्य झाल कसं? :-
जत्रा ,सप्ताह बंद ठेवून शाळेसाठी वर्गणी गोळा करून निधी दिला.
ग्रामस्थांनी पुढे येऊन सुमारे ५-६ कोटी रूपयांची जागा बक्षीसपत्र करून दिले आहे.