अहिल्यादेवी होळकर आणि महेश्वरी साडी

मराठी लेख

माहेश्वरी साडी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवि gglnw_ad

1767 साली अहिल्यादेवींनी आपली राजधानी इंदूर वरून माहेश्वरी ला हलवली आणि वेगानं माहेश्वरीचा कायापालट व्हायला सुरुवात झाली. gglnw_ad

घाट, मंदिरे, रस्ते आणि दस्तुरखुद्द होळकरांची राजधानी म्हणताना माहेश्वरीच्या सौन्दर्यात भर पडू लागली. gglnw_ad

खरं तर माळव्यात 5 व्या शतकापासून वस्त्रोउद्योगला सुरुवात झालेली पण माळव्याला आणि विशेषतः माहेश्वरीतील वस्त्रोद्योगला खरी भरभराट आली ती अहिल्यादेवींच्या शासनकाळात. gglnw_ad

अहिल्यादेवींनी माहेश्वरी राजधानी हलवताच सुरत, माळवा आणि हैद्राबाद तसेच मांडव्याहून विशेष विणकामगाराना बोलावून वेगळ्या धाटणीची साडी बनवायला सांगितलं.gglnw_ad

हि साडी साधारणतः 9 यार्ड म्हणजे 27 फुट लांब असे आणि याच्या किनारीवर काही कलाकृती किंवा चित्रं विणली जात.बऱ्याचदा हि चित्र महेश्वरच्या किल्ल्यात असलेल्या भिंतीतील पाहून काढली जात. gglnw_ad
आजही अनेक माहेश्वरी साड्यांवर किल्ल्यातील भिंतीवरील चित्र आपल्याला पाहायला मिळतात. gglnw_ad

अशा प्रकारची साडी बनवुन घेण्यामागे अहिल्यादेविंचा उद्देश होता की राजघराण्यातील स्त्रियांना साडी चोळी म्हणून भेट द्यायला आणि होळकर संस्थानाला भेट देणाऱ्या पाहुण्यांना भेट देण्यासाठी विशेष भेट म्हणुन gglnw_ad

आणि एक वेगळी ओळख म्हणून मातोश्रीनी या साड्या स्वतः लक्ष घालून बनवून घेतल्या.पुढं हीच साडी राजघराण्यात आणि खानदानी घराण्यांची वेगळी ओळख बनली gglnw_ad

गेली 250 वर्षांपासून अनेक विणकामगारांच्या पिढ्या इथं गुंण्यागोविंदान राहून अर्थार्जन करीत आहेत. gglnw_ad

आजही माहेश्वरी साडी हि महेश्वर ची वेगळी ओळख असून करोडोंची उलाढाल ह्या उद्योगाच्या माध्यमातून होत आहे. gglnw_ad

मातोश्रींबद्दल बोलताना आचार्य विनोबा भावे म्हणतात की,आम्ही जिथं जिथं गेलो तिथं तिथं आम्ही परप्रांतीयांच्या मुखातून अहिल्यादेवींची स्तुतीच ऐकली. gglnw_ad

शस्त्रबळाने दुनियेला जिंकणार अनेक आहेत,परंतु प्रेमाने,धर्मशक्तीने,भारतातील सर्व प्रांतांना जिंकणारी अहिल्यादेवि ह्या एकमेव होत.. gglnw_ad
माहिती साभार: the real story behind maheshwari saree

  • निशांत शेळके पाटिल