हाताला मेहंदी लावण्याऐवजी उचलली काठी,निकाहच्या अगोदर पुर्ण करतेय वर्दीची जबाबदारी.

मराठी लेख

हाताला मेहंदी लावण्याऐवजी उचलली काठी ,लग्नाच्या अगोदरच पुर्ण करतेय वर्दीची जबाबदारी ..

देशभर कोरोना व्हायरसमुळे लाॅकडाऊन केल आहे.अशातच दररोज कोणात्यातरी सामान्य माणसाबद्दल माहीती पुढे येत आहे जो अशा संकटसमयी अतिशय जिद्दीने देशाची सेवा करतोय.मागच्या महीन्यात एक गर्भवती महीला जी सफाई कर्मचारी होती ती देशासाठी पुढे सरसावली होती आणि आज अशाच एका पोलीस अधिकारणी विषयी माहीती समोर आलीय ती लग्नाची मेंहदी हातात लावण्याऐवजी काठी घेऊन आपली ड्युटी करत आहे.चला तर तिच्याबद्दल जाणून घेऊ.

उत्तराखंडच्या त्र्रू्षिकेश मध्ये तैनात सब इंन्सपेक्टर शाहिदा परवीन एप्रिल महिन्यात विवाह बंधनात अडकणार होती परंतू कोरोनामुळे तिच लग्न रद्द झालं.अशातच आपली जबाबदारीवर लक्ष केंद्रीत करत तिने कोरोनाला हरवून लग्न करण्याचा निर्णय घेतला.५ एप्रिलला शाहीदा आपल्या कामावर रूजू झाली.
२०१६ च्या बॅचमधील शाहीदा परवीन ही मुनिकीरेती पोलीस ठाण्यात तैनात आहे.
तिचा विवाहसोहळा हरिद्वार निवासी शाहीद शाह यांचे पुत्र गुलाम साबिर सोबत ५ एप्रिलला होणार होता.शाहीद शाह हे सध्या हरिद्वार रेल्वे मध्ये टीटीई या पदावर कार्यरत आहेत.दोन्ही परिवाराकडून लग्नाची तयारी झाली होती.

सब इंन्सपेक्टर यांनी लग्नासाठी ५० दिवसांतून रजा सुध्दा घेतली होती.परंतू त्यानंतर पीएम नरेंद्र मोदी यांनी लाॅकडाऊनची घोषणा केली आणि म्हणूनच शाहीदा यांनी आपली जबाबदारी पुर्ण करण्यासाठी लग्न रद्द करुन काठी हातात घेतली.