राज्यातील सलून व्यवसायाविषयी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय..

Uncategorized

राज्यातील सलून व्यवसायाविषयी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय..

देशासह राज्यात कोरोनाचा कहर झालेला असल्यामुळे पहिल्या तीन महिन्यांतल्या लॉकडाऊन काळात

आणि आता अनलॉक वन च्या काळातही राज्यातले सलूनचे दुकान पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते.

कोरोनाचा फैलाव वाढू नये यासाठी राज्यातील पूर्ण सलून व्यवसाय बंद ठेवण्यात आल्याने सलून व्यवसायिकांचं मोठं नुकसान झालं. परंतु राज्याच्या सुरक्षेसाठी हे गरजेचं होतं.

आता मात्र ठाकरे सरकारने सलून व्यवसायाविषयी मोठा निर्णय घेतला आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत येत्या २८ जूनपासून राज्यातील सलून व्यवसायाला पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्यातील महाविकासआघाडी सरकारने घेतला आहे.

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने सलून व्यवसायिकांना अनेक संकटं आली.

रोजची मिळकत देखील बंद असल्याने सलून व्यवसायिक चिंतेत होते. लवकरात लवकर सरकारने आम्हाला सलून चालू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी देखील सलून व्यवसाय संघटनेने केली होती.

आज राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो सलून व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.