कोरोनाच्या लढाईत काम करणाऱ्या वडिलांचं,वाढदिवसा निमित्त मुलाला भावनिक पत्र.

मराठी लेख

कोरोनाच्या लढाईत काम करणाऱ्या वडिलांचं,वाढदिवसा निमित्त मुलाला भावनिक पत्र. gglnw_ad

प्रिय आरव…..

आज तुझा पहिला वाढदिवस, तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.. gglnw_ad

तुझा पहिला वाढदिवस पण बाळा तुला आज फक्त प्रेम आणि शुभेच्छाच देऊ शकतो,लॉक डाउन मुळे सगळे बंद आहे रे gglnw_ad
तुला नवीन कपडे ही नाही घेता येत.तू अजून खूप लहान आहेस पिल्ल्या,त्यामुळे तुला लॉक डाउन कोविड – १९ चा वाढता प्रादुर्भाव यातले काही समजणार नाही gglnw_ad
पण बाळा ज्यांना समजतंय ते पण समजून ना समजल्यागत करतायत आणि बिनधास्त कारण नसताना घराबाहेर पडून “करोनाला ” आमंत्रण देतायत. gglnw_ad
आरु,मला मात्र रोज घराबाहेर पडावं लागतं कामासाठी. अत्यावश्यक सेवेत आहे ना बाळ मी gglnw_ad त्यामुळे पण जेव्हा कामावरून घरी येत असतोना बाळा मी,तेव्हा डोकयात नुसतं विचारांचं काहूर माजलेलं असतं


कारण,रोज कोविड १९ च्या पॉसिटीव्ह रुग्णांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग साठी त्यांच्या एरियात जावं लागतं gglnw_ad
कधी कोविड १९ टेस्टच्या कॅम्प साठी रजिस्ट्रेशन करावं लागतं,त्यामुळे याआधी तुझ्या ओढीने घराकडे येणारी पाऊले आता थबकतात gglnw_ad
घरी यायला भीती वाटते पण यावं लागतं,तुझ्यासाठी आणि तुझ्या मम्मी साठी gglnw_ad
घरी आलो की तू जागा असलास तर तुझी धडपड चालू होते,माझ्याकडे येण्यासाठी gglnw_ad
पण नाही घेऊ शकत मी तुला..तुला अजून बोलता येत नाही पण तुझे डोळे आणि हावभाव खूप काही बोलून जातात या बापाशी gglnw_ad
यासाठी माफ कर,तुझा वाढदिवस गावी आजी -आजोबांकडे करायचं ठरलं होतं पण कर्तव्यामुळे गावी नाही जाता आल आपल्याला gglnw_ad
बाळ आरव,सध्या या कोविड – १९ ला रोखण्यासाठी बाळा संपूर्ण आरोग्य विभाग-पोलीस प्रशासन -सफाई कामगार आप-आपल्या कर्तव्यावर आहेत. gglnw_ad
आरव…. माझ्या सारखे असे असंख्य लोकं आपल्या मुलां-बाळापासून घरा-दारापासून दूर राहून किंवा ये जा करून आपलं या कोविड १९ च्या लढ्यात योगदान देत आहेत. gglnw_ad
सध्या नोकरीतल्या कर्तव्यामुळे कदाचित एका बापाची कर्तव्य माझ्यापासून राहून जात असतील पण बाळा. gglnw_ad
कोविड १९ चा लढा जेव्हा जिंकू ना तेव्हा मी खूप आनंद साजरा करीन कारण त्यांनंतर मला तुला जवळ घेता येईल gglnw_ad
तुला मनसोक्त माझ्या अंगा -खांदयावर खेळवता येईल आणि हो,हा आनंद साजरा करून मी एक “बाप” म्हणून तुझ्या कर्तव्यात हजर होऊन तुझी सर्व कर्तव्य पार पाडीन.. हा शब्द…. gglnw_ad
तूर्तास थांबतो…. तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा… खूप मोठा हो.. खूप नाव कमव… gglnw_ad
तुला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना…
तुझा बाबा
– राजू दादासाहेब झंजे