मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला पुण्याच्या महापौरांना फोन,म्हणाले की..

बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला पुण्याच्या महापौरांना फोन,म्हणाले की..

शिवसेना आणि भाजप हे राज्यात एकमेकांविरोधात असले तरी मुख्यमंत्र्यांनी राजकारण बाजूला ठेवून पुन्हा एकदा आपल्या दिलदारपणाचं आणि माणुसकीचं दर्शन घडवलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना फोन करून तब्येतीची विचारपूस केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुरलीधर मोहोळ यांना फोन करून तुम्ही तुमची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या कुटुंबातील इतर ८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या कामाचं कौतुक देखील केले आहे.

तुम्ही फिल्डवर अतिशय उत्तम काम केलं आहे आता ठणठणीत बरे होऊन लवकर घरी परता अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

राज्यात भाजप आणि शिवसेनेत टोकाचे राजकीय मतभेद असले तरी कोरोना संकटांच्या कठीण काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकीय चेहर्यापलीकडे असलेल्या दिलदारपणाचं आणि माणुसकीचं दर्शन घडवल्याचं सर्वत्र बोललं जात आहे.

एवढंच नव्हे तर पुणे महापालिकेत नगरसेवक असलेले मुरलीधर मोहोळ हे सुद्धा थेट मुख्यमंत्र्यांचा फोन आला हे पाहून हरखून गेले आहेत.

पुणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे महापौरांवर मोठी जबाबदारी आहे. त्यांना ताप आल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती.

शनिवारी संध्याकाळी आलेल्या रिपोर्ट मध्ये त्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. पुणे शहराचे प्रथम नागरिक या नात्याने त्यांनी अनेक बैठकांना उपस्थिती लावली होती म्हणूनच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.