भाजपचा विधानपरिषद बाबत मोठा निर्णय : ‘या’ उमेदवाराचा अर्ज घेतला माघारी.

Uncategorized

भाजपचा विधानपरिषद बाबत मोठा निर्णय : ‘या’ उमेदवाराचा अर्ज घेतला माघारी. gglnw_ad

राज्यात येत्या २७ मे रोजी विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेने २ राष्ट्रवादीचे २ कॉंग्रेसचा १ असे महाविकासआघाडीचे एकुण ५ उमेदवार रिंगणात असुन gglnw_ad
भारतीय जनता पक्षाचे ४ उमेदवार उभे आहेत. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जास्त आहे. gglnw_ad

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर उभा राहिलेला घटनात्मक पेचप्रसंग टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने ही निवडणूक लावली आहे. gglnw_ad
भाजपने ४ उमेदवार जाहीर केले मात्र त्यांनी पाचव्या उमेदवाराचा अर्ज देखील भरला. भारतीय जनता पक्षाचे नेते रमेश कराड यांनी भाजपकडून पाचवा अर्ज भरला होता. gglnw_ad

आज भाजपने आपला एक उमेदवार बदलून पुन्हा एकदा धक्कादायक निर्णय घेतला आहे. gglnw_ad
भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गोपछेडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असुन त्यांच्या जागी पाचवे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेले रमेश कराड हे भाजपचे अधिकृत उमेदवार असतील अशी घोषणा भारतीय जनता पक्षाने केली आहे. gglnw_ad

अगोदरच या विधानपरिषद निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत त्यात भाजपने उमेदवार बदलून अजुन एक धक्का दिला आहे. gglnw_ad
रमेश कराड हे विधानसभा निवडणुकीत लातुर ग्रामीण मतदारसंघातुन धिरज देशमुख यांच्या विरोधात लढण्यासाठी गेली ५ वर्ष झाले तयारी करत होते मात्र शिवसेना भाजप युती मध्ये ती जागा शिवसेनेला सुटल्याने कराड यांचा पत्ता कट झाला. gglnw_ad
तेव्हापासून रमेश कराड आणि त्यांच्या समर्थकांमध्ये अन्याय झाल्याची भावना होती. gglnw_ad

दुसरीकडे अनेक निष्ठावंत आणि जुन्या ज्येष्ठ नेत्यांची तिकीट कापून बाहेरून आलेल्या gglnw_ad
आणि काही तरूण उमेदवारांना विधानपरिषद निवडणुकीची उमेदवारी जाहीर केल्याने राज्य नेतृत्वावर पक्षातील एका गटाकडून तीव्र भावना व्यक्त केल्या जात होत्या gglnw_ad
म्हणूनच पक्षाने ही उमेदवारी बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे नाकारता येत नाही.